औरंगाबाद : राज्यात होणार्या जोरदार पावसामुळे पुराने थैमान घातले आहे. पुरात अनेकांचे संसार बुडाले आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्तांना मदतीची हाक दिलेली आहे. त्यानुसार औरंगाबाद युवासेना शाखेच्या वतीने पुरग्रस्तांसाठी आवश्यक साहित्य रवाना करण्यात आले आहे.
कोकण, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रायगडमध्ये तुफान अतिवृष्टी झाली. यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहे. तसेच अनेकांना आपला जीव गमवावा लागला. राज्यात अनेक ठिकाणी पुरानेही चांगलेच थैमान घातले आहे. तसेच कोरोना चे संकट आहे अजून कायम आहे. ऑगस्ट महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले होते. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथील युवा सेनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत पाठवण्यात आली आहे.
औरंगाबाद युवा सेना शाखेचे चिटणीस धर्मराज अंबादास दानवे याच्या वतीने महानगरप्रमुख आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि.२६) जीवनावश्यक साहित्य रवाना करण्यात आले. या साहित्यामध्ये ब्लांकेट्स, मास्क, साबण यासह गरजेच्या वस्तूंचा समावेश आहे. यावेळी शिवसेनेचे उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे, प्रमोद ठेंगडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर नवले पाटील, विभाग प्रमुख नंदकुमार लबडे, सोमनाथ बोंबले, बाळासाहेब दानवे, विशाल राऊत, युवासेनेचे सागर भारस्कर, मधुर चव्हाण, शिवराज शिंदे, मयूर घोडके, विशाल गायकवाड, ऋत्विक पाटील, अभिजित पाटील, आकाश दानवे आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- पूरग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा ; ‘इतक्या’ कोटींची मदत जाहीर
- महापुराचा फटका बसूनही रायगडमध्ये ८००० हून अधिक जणांचं लसीकरण
- उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही, असं राऊतांना वाटतं – फडणवीस
- कोरोना इफेक्ट! पदव्यूत्तर विभागाच्या परिक्षा यंदाही ऑनलाईन पद्धतीनेच होणार
- राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला सत्ताधारी आमदार, खासदार गुल, भाजपची टीका