पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी संघर्ष समिती स्थापन

औरंगाबाद  (राजू म्हस्के )- औरंगाबाद महानगरपालिकेने शहरवासीयांना दररोज मुबलक पाणीपुरवठा करावा या मागणी साठी समन्वय संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची घोषणा एका पत्रकार परिषदेत डॉ गफ्फार कादरी यांनी केली. यावेळी विधी सल्लागार खोले पाटील, विष्णू पुंगळे, भारत गायकवाड, राहुल इंगळे, सुभाष परदेशी, राजू जगधने आदींची उपस्थिती होती.
शहरवासीयांना त्यांच्या हक्काचे पाणी दररोज मुबलक प्रमाणात आणि इतर मनपांच्या दरा च्या तुलनेत द्यावं, या मागणी साठी आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली. शहरात 4 हजार रुपये पाणीपट्टी आकारली जाते, पुणे, नासिक, मालेगाव, मुंबई आदी ठिकाणी दिवसातून दोनदा पाणीपुरवठा करून 2 हजार च्या आत पाणीपट्टी असते. औरंगाबाद मनपाने काहीही करून शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करावा या मागणी साठी 23 फेब्रुवारी रोजी धरणे आंदोलन करन्यात येणार आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली.