औरंगाबादची दंगल म्हणजे कायदा-सुव्यवस्था कोसळून पडल्याचा पुरावा

मुंबई – औरंगाबादमध्ये नळ कनेक्शन तोडण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाल्याने. शुक्रवारच्या मध्यरात्री औरंगाबादमध्ये हिंसाचार उसळला होता . यामध्ये २ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. मोठ्या प्रमाणत वित्तहानी झाली होती. दरम्यान औरंगाबाद हिंसाचारावरून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.”किरकोळ कारणांवरून दंगल व्हावी आणि शेकडो कोटींचे नुकसान व्हावे हे काही योग्य नाही. ही कारणे पुचाट आहेत व दंगली निदान अशा कारणांमुळे तरी भडकू नयेत. राज्याची कायदा-सुव्यवस्था कोसळून पडल्याचा हा पुरावा आहे”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.

शिवाय, ”शहराला गेल्या कित्येक महिन्यांपासून पोलीस आयुक्त नाहीत. इतक्या मोठ्या संवेदनशील शहरास आयुक्त मिळू नये हेच मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या गृहखात्याचे अपयश आहे. ‘भाजप’धार्जिणा अधिकारी गळास लागत नाही तोपर्यंत पोलीस आयुक्त नेमायचा नाही असा पण मुख्यमंत्र्यांनी केला असल्याचा आरोप देखील उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

bagdure

संभाजीनगरात दंगलीचा भडका उडाला असून हिंसाचारात दोन जण ठार झाले आहेत. दंगल सरळ सरळ जातीय आहे. हिंदू व मुसलमानात उडालेला हा भडका असून शहराचे जनजीवन साफ विस्कळीत झाले आहे. या दंगलीचे नेमके कारण काय? दंगलीस जबाबदार कोण? भडका उडाला, पण ठिणगी नक्की कोठे उडाली? याबाबत संभ्रम आहे. दंगल भडकण्याची चार कारणे समोर आली, ती हास्यास्पद आहेत.

शहरात अनधिकृत नळ कनेक्शन जोडणी व तोडण्यावरून किरकोळ वाद झाला व त्यातून पेटवापेटवी झाली.गांधीनगरमधील एका गॅरेजमध्ये मोबाईल देण्या-घेण्याच्या क्षुल्लक कारणावरून दंगल पेटली. आठ दिवसांपूर्वी शहरातील शहागंज भागात उन्मेष हुलिए या राजाबाजार येथे राहणाऱया तरुणाने एकाकडून आंबे विकत घेतले. ते आंबे खराब निघाल्यामुळे तो हे आंबे परत करण्यास गेला. तेव्हा दुकानदाराने ते आंबे फेकून देऊन उन्मेषला मारहाण केल्याने तणाव निर्माण झाला व दंगल पेटली. पानपट्टीच्या अनधिकृत टपऱया हटवल्याने लोकं चिडली व दंगलीस सुरुवात झाली.

अशी विविध कारणे आता समोर आली आहेत, पण आंबे, मोबाईल, पानाची टपरी अशा किरकोळ कारणांवरून दंगल व्हावी आणि जान मालाचे शेकडो कोटींचे नुकसान व्हावे हे काही योग्य नाही. ही कारणे पुचाट आहेत व दंगली निदान अशा कारणांमुळे तरी भडकू नयेत. आणि जर या कारणांमुळे दंगली होतं असतील तर हे गृह खात्याचे अपयश आहे अशी टीका आजच्या सामनाच्या संपादकीयमधून करण्यात आली आहे.

You might also like
Comments
Loading...