Aurangabad Violence : लच्छू पहिलवानच्या अटकेच्या निषेधार्त व्यापाऱ्यांचा बंद

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये मागील आठवड्यात झालेल्या दंगलीमध्ये दोन गटात झालेल्या वादामुळे तणाव निर्माण झाला होता . शहरातील काही भागांमध्ये जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. गांधीनगर, मोती कारंजा, रोजा बाग या भागात मोठ्या प्रमाणत वित्तहानी झाली होती. तसेच या घटनेत २ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर २५ जण जखमी झाले होते.

Rohan Deshmukh

दरम्यान दंगलीप्रकरणी बुधवारी रात्री विशेष तपास पथकाने (एसआयटी) शिवसेना कार्यकर्ता लक्ष्मीनारायण बाखरिया ऊर्फ लच्छू पहिलवानला अटक केली. याच्या निषेधार्त आज गुलमंडी, धावणी मोहल्ला येथे व्यापाऱ्यांनी बंद पाळला. मागील आठवड्यात झालेल्या दंगलीमागे लच्छू पहिलवान असल्याचा आरोप एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी केला होता. या घटनेनंतर त्याचा या दंगलीशी काही संबंध आहे का, याविषयी पोलीस तपास करीत होते. दंगलीसोबतच तोडफोड आणि जाळपोळीच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...