Aurangabad violence : गोवर्धन कोळेकर यांना उपचारासाठी मुंबईला हलवणार

औरंगाबाद – औरंगाबादमध्ये शुक्रवारी मध्यरात्री उसळलेल्या दंगलीवर नियंत्रण मिळवताना जखमी झालेल्या सहाय्यक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांची प्रकृती चिंताजनक असून, कोळेकर यांच्यावर सिग्मा या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने  पूढील उपचारांसाठी कोळेकर यांना एअर अॅम्ब्युलन्सद्वारे आज मुंबईला हलवण्यात येणार आहे.

हिंचाचार रोखण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर शुक्रवारी मध्यरात्री दगडफेक करण्यात आली होती. यात कोळेकर गंभीर जखमी झाले आहेत. स्वरयंत्रणेच्या हाडाला जबर मार बसल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.

You might also like
Comments
Loading...