औरंगाबाद विद्यापीठाच्या 43 व्या नाट्य महोत्सवाचे उदघाटन

औरंगाबाद- डॉ बाबासाहेब आबेंडकर मराठवाडा विद्यापीठातिल नाट्य शास्त्र विभागातर्फे आयोजित 43 व्या नाट्यमहोत्सवाचे  उदघाटन आज सायंकाळी सहा वाजता प्रसिध्द नाट्य तथा सिनेअभिनेत्री वंदना गुप्ते  यांनी केले .दिनांक 14 मार्च ते 28 मार्च दरम्यान हा नाट्य महोत्सव पार पडणार आहे . यामध्ये डॉ सतीश पावडे लिखित व  बाळू बटुले दिग्दर्शित  नाटक “कुळभूषन सभांजी राजे” , डॉ प्रशांत लिखित व पूजा कळकुबें दिग्दर्शित नाटक “यातला विनोद गांभीर्याने घ्या”,  आनंद नीकलजे लिखित व आनंद नीकालजे आणि किरण पवार दिग्दर्शित नाटक “प्रुथ्वीराज चव्हाण” ,  शेक्सपिअर लिखित श्रीकांत भालेराव दिग्दर्शित नाटक “रोमिओ आणि ज्युलिएट” , जयंत उपाध्याय लिखित व रुपाली आल्हाट दिग्दर्शित नाटक “मर्डरवाले कुलकर्णी” , अजित देशमुख लिखित व  प्रशांत अवसरमोल दिग्दर्शित नाटक “मुम्बईला चाललो आम्ही” , डॉ विवेक बोळे लिखित व चंद्रकांत हिवाळे आणि अभिजित वाघमारे दिग्दर्शित नाटक  “माकडाच्या हाती शँम्पेन” , चिन्मय मंडलेकर लिखित व तेजस बिल्दिकर दिग्दर्शित नाटक “गेंडा” , प्रशांत दळवी लिखित व प्रेरणा कीर्तीकर दिग्दर्शित नाटक “चारचौघी” , संदीप पाटील  लिखित व   राजेश आगुंडे दिग्दर्शित नाटक “आग उफनती नदी और किनारे” , सुमीत तौर लिखित व संदीप देशमुख दिग्दर्शित नाटक “थोडे थोडे तिन्ही वेडे” , शिवराज गोर्ले लिखित व माणिक गवई दिग्दर्शित नाटक “कूर्यात सदा टिंगलम” , गणेश मुंढे लिखित व दिग्दर्शित नाटक “रुसवा फूगवा” , चिन्मय मांडलेकर लिखित व प्राजक्ता चौरे दिग्दर्शित नाटक “समुद्र” , प्रशांत दळवी लिखित व दिशा वडमारे  दिग्दर्शित नाटक “चाहूल” अशी नाटके पार पडणार आहेत .आजच्या कार्यक्रमाचे  अध्यक्ष प्र कुलगुरू प्रा.डॉ.अशोक तेजनकर कुलसचिव प्रा.डॉ..साधना मांडे  नाट्यशास्त्र विभागप्रमुख प्रा .डॉ जयंत शेवतेकर यांची उपस्थितिती होती .

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...