दिनदयाळ उपाध्याय कौशल्य केंद्राला एनएसयुआयने काळे फासले

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थी संघटनांनी सोमवारी (ता.16 ) दिल्ली येथील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात घडलेल्या घटनेचा निषेध नोंदविला. विविध संघटनांनी एकत्रित येत विद्यापीठ बंद केले. पोलिसांच्या हस्तक्षेपाने काहीकाळ तणाव निर्माण झाला. दरम्यान एनएसआयुच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठातील दीनदयाळ उपाध्याय कौशल्य केंद्राला काळे फासले. यामूळे मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

दिल्ली येथील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा विधयेकच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी वसतिगृहात घुसून लाठीमार केला. या घटनेचे देशभर पडसाद उमटत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडिया, सत्यशोधक संघटना, सम्यक विद्यार्थी आंदोलन या संघटनांनी विद्यापीठ बंद पुकारला.

Loading...

विद्यापीठात आंदोलक विद्यार्थ्यांनी सकाळी साडेअकराला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यापीठातील पुतळ्यापासून सुरवात केली. त्यानंतर शैक्षणिक विभाग, ग्रंथालय आणि अभ्यासिका बंद ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी आंदोलन चिघळत असल्याचे लक्षात आल्यानंतर बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यानी प्रमुख आंदोलक विद्यार्थ्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावला. त्यामुळे विद्यापीठात काही वेळ तणाव निर्माण झाला. विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुच असून विद्यापीठातील वाय कॉर्नरवर समारोप होणार आहे.

दिनदयाळ उपाध्याय यांच्या नावाला फासले काळे
दिल्ली मध्ये घडलेल्या संघ प्रणित भाजपने जो विद्यार्थ्यांवर अमानुष हिंसाचार केला. त्याचा निषेध म्हणून संघ प्रचारक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाला विद्यार्थी कॉंग्रेस(NSUI)ने विद्यापीठ येथे काळे फासले. अशी प्रतिक्रिया एनएसयुआयने दिली.यावेळी NSUI चे जिल्हा अध्यक्ष मोहित जाधव, कार्याध्यक्ष देव राजळे, विद्यापीठ अध्यक्ष योगेश बहादूरे, प्रसिद्ध प्रमुख अजय भुजबळ उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?