औरंगाबाद : गेल्या चोवीस तासात दोन माजी शिवसेना नगरसेवकांचा मृत्यू

blank

औरंगाबाद : राज्यात कोरोनाचा प्रसार होऊन ३ महिने झाले असून बधितांचा वाढता आकडा व प्रशासनाच्या अपुऱ्या सोयीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या २ लाख १२ हजारांवर गेली असून गेल्या २ ते ३ दिवसात अनेक जिल्ह्यात कोरोनाने उच्चांक गाठला आहे.

अनेक बड्या नेत्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाचा विळखा बसत आहे. औरंगाबाद शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आतापर्यंत 327 लोकांनी आपला जीव गमवला आहे.मागील 24 तासात शिवसेनेच्या दोन माजी नगरसेवकांचा मृत्यू झाला आहे.

शिवसेनेचे उत्तम नगर बौद्धनगर वाँर्डाचे माजी नगरसेवक नितीन साळवी यांना कोरोनाची लागण झाली होती. काल दुपारी त्यांच दू:खद निधन झालं.त्यांच वय ४७ वर्ष होते. केमोथेरपीद्वारे त्यांच्यावर उपचारही सुरू होते. २६ जूनला एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोरोनाच्या तपासणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

तर दुसऱ्या बाजूला पडेगावचे माजी नगरसेवक रावसाहेब आम्ले यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज सकाळी आठ वाजता त्यांचा मृत्यू झाला. आठ दिवसापूर्वी त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. घाटी रुग्णालयातून त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.

२०१५ झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत ते शिवसेनेतर्फे निवडून आले होते. २४ जूनला त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ह्या दोन्ही घटनेमुळे शहरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात पुनश्च हरी ओम जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केला असला तरी राज्यातील अनेक जिल्हे व शहरातील कोरोनाची वाढती गंभीर परिस्थिती बघता त्या ठिकाणी लॉकडाऊन करण्यात येत आहे.

पुण्यातील व्यापारी हबसाठी लागणार काही हजार एकर जागा, शरद पवारांकडे मागणी

राजगृह तोडफोड प्रकरण : शांतता राखण्याचं प्रकाश आंबेडकर यांनी केलं आवाहन

राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची गय करणार नाही, कडक कारवाई होणारच – मुख्यमंत्री