जर्मनीसोबत होणार औरंगाबादचा सामंजस्य करार

औरंगाबाद – औरंगाबाद शहर आणि जर्मन शहर इंगोल्स्टँड यांच्यात आगामी काळात शिक्षण, उच्च शिक्षण, उद्योग, व्यापार, पर्यावरण, ट्रेड, पर्यटन वाढीसाठी सामंजस्य करार होणार आहे. दोन्ही शहराच्या शिष्ठमंडळांची व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे मंगळवारी चर्चा संपन्न झाली. यास दोन्ही शहरातील शिष्ठमंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आगामी काळात जर्मनीसोबत औरंगाबादचा सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

नांदेड येथील मुळचे रहिवाशी असलेले भारतीय वाणिज्य दुतावास डॉ. सुयश चव्हाण यांनी या कॉन्फरन्ससाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी इंगोल्स्डॅट शहराचे भौगोलिक, विविध देशांतील प्रदेश आणि शहरे यांच्यामाध्यमातून औरंगाबाद व इंगोल्स्टँड एकत्र कसे येऊ शकेल, सामंजस्य कराराच्या माध्यमातून दोन्ही शहरांना कसा फायदा होऊ शकेल यासंदर्भात तपशीलवार सादरीकरण केले.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) चे सीईओ अस्तिककुमार पांडे यांनी कराराबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, २५ जानेवारीपूर्वी दोन्ही शहरांची टिम सामंजस्य करार (स्वाक्षरी) करेल. उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यटनमंंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकार तसेच मार्गदर्शनाद्वारे हा करार महत्वपूर्ण ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या