औरंगाबाद: रंगमंदिर बांधताय की ताजमहल; कलाकारांचा सवाल

औरंगाबाद: शहरात जसा ऐतिहासिक वारसा आहे तसाच सांस्कृतिकचाही वारसा आहे. ऐतिहासिकप्रमाणे संस्कृतिक वर्षाची ही ही स्थिती शहरात बिकट बनली आहे. सांस्कृतिक क्षेत्रात वैभव असलेले संत एकनाथ रंग मंदिर , सिडकोतील जगद्गुरु संत तुकाराम नाट्यगृह यांची पूर्तता वाट लागली आहे. गेल्या 19 महिन्यांपासून सुरू असलेले संत एकनाथ रंगमंदिराचे काम अद्यापही सुरू असल्याने रंगकर्मींनी महापालिका विरोधात नाटक सादर करून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. रंग मंदिर बांधताय की ताजमहल असा उपरोध टोला महापालिकेला लगावला.

मराठी नाटकांचे प्रयोग व मराठी सांस्कृतिक कार्यक्रमाची केंद्रबिंदू असलेल्या संत एकनाथ रंग मंदिराच्या आधुनिकीकरणासाठी गेल्या एकोणावीस महिन्यांपासून काम सुरू आहे. त्या अद्यापही पूर्ण झालेले नाही. काम हे अर्धवट असल्याने रंगकर्मींनी या विरोधात आवाज उठवला मराठी रंगभूमी दिनानिमित्त सर्व कलावंतांनी एकत्र येत या रंग मंदिराची पाहणी केली. रंगमंदिराची अर्धवट कामाची अवस्था पाहून एकांकिका सादर करीत महापालिकेची वाभाडे काढले.

एवढेच नाही तर या नादुरुस्त रंगमंदिरात रंगभूमीचे पूजाने केले आणि आपला नाटक, बतावणी च्या माध्यमातून राग व्यक्त केला.
यावेळी पंडित विश्वनाथ, लोक कवी दासू वैद्य, कलाकार रोहित देशमुख, कमलेश महाजन, शितल रुद्रवार, राजु परदेशी व इतर मान्यवर उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या