औरंगाबाद: वाळूच्या साठ्याखाली आढळला मृतदेह

murder

औरंगाबाद: आज सकाळी ११ वाजता हडको एन-१२ येथील राष्ट्रवादी भवन शेजारी असलेल्या वाळूच्या ढिगाऱ्याखाली समाधान किसन मस्के या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. आहे. मृत व्यक्ती वय ३६, नवनाथनगर , सिडको एन-११ येथील रहिवासी आहे. घरी पत्नी व दोन मुलांचा परिवार आहे.

याठिकाणी आज सकाळी वाळू काढत आसताना राजू शेखच्या मजूराना त्यात दडलेला एक मृतदेह दडलेला आढळून आला. यानंतर त्यांनी तत्काळ याची माहिती सिडको पोलिसांना दिली. त्यानंतर  एसीपी नागनाथ कोडे आणि पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहास तपासणीसाठी शासकीय रुग्णालय घाटी येथे पाठविण्यात आले आहे. मृताच्या डोक्याला मार असून त्यांना वाळूत पुरण्यात आल्यामुळे हा खुनाचा प्रकार असू शकतो असा संशय पोलिसांना आहे.