‘तारा पान’लाही दिला जातोय धार्मिक रंग; ओवैसींच्या विधानानंतर सोशल मिडीयावर तारा पानची बदनामी

tara pan center aurangabad

नारायण काळे: एमआयएमचे अध्यक्ष खा असदुद्दिन ओवैसी यांनी केलेल्या ‘तारा पान सेंटर’वरील वादग्रस्त विधानानंतर सोशल मिडीया वर तर्कवितर्कांना उधाण आले असुन अनेक जणांनी या पानाला धर्माशी जोडत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मिडीयावर हे पान न खाण्याचा सल्लादेखील देण्यात येत आहे. पानच्या हिरव्या रंगाला धार्मिक बाबींशी जोडत लोकयावर उलटसुलट चर्चा करत आहेत.

काय होते ओवैसींचे व्यक्तव्य?
विश्व हिंदू परिषद व आरएसएस वर टिका करताना ओवैसी म्हणाले होते. ”जर ”आरएसएसच्या लोकांना मुलं होत नसतील तर औरंगाबादमधील प्रसिद्ध तारा पान सेंटरवरील पान त्यांनी खावे. त्यांना नक्कीच फायदा होईल.”

Loading...

ओवेसींच्या या विधानंतर सोशल मिडीया वर तारा पान सेंटरची होत असलेल्या बदनामी बद्दल आम्ही तारा पान सेंटरचे मालक शब्बू भाई यांची प्रतिक्रिया जाणुन घेतली.

”राजकीय नेत्यांना काहीही कामे नसतात त्यांमुळे ते आपल्या राजकीय स्वार्थासाठी काहीही बोलतात. ओवैसींनी कधी इथे येवून तारा पान खाल्ले नाही. त्यामुळे त्यांनी या पानाबद्दल काही बोलू नये.पान हे भारतीय संस्कृतीचे अभिन्न अंग आहे. आपण प्रत्येक सुखदुखाःत पान खातो. त्यामुळे याला धर्माशी जोडने योग्य नाही.” – शब्बू भाई (तारा पान सेंटरचे मालक)

‘तारा पान’ बद्दल सोशल मिडीया वरून जरी बदनामी होत असली तरी या बदनामीचा पानांच्या विक्रीवर कसलाही परिणाम होत नसल्याचे जाणवत असुन अगदी दूरदूरवरून लोक या ठिकाणी पान खाण्यासाठी येत आहेत.

tara pan center aurangabad

मी अनेक ठिकाणी पान खाल्ले पण येथील पानाची चव वेगळीच आहे. अशा प्रकारचे पान आपण आतापर्यंत खाल्ले नाही. पान सेंटरचा इंटरनेट वरील व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्ही याठिकाणी आलो आहोत -सिता अय्यर (कर्नाटक)

tara pan center aurangabad

 

काय आहेत तारा पान सेंटरची वैशिष्ट्ये?

– 50 वर्षापासून शब्बुभाई हे पान सेंटर चालतात.

– वेगवेगळ्या प्रकारच्या जवळपास 25 पानांची विक्री

– 20 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंतचे पानं उपलब्ध

– 5000 रूपयांचे ‘कपल पान’, 3000 रुपयांचे लेडीज स्पेशल ‘कोहिनूर पान’ प्रसिद्ध.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार