भावी शिक्षक म्हणतो, नोकरीसाठी 35 लाख भरलेत, कॉपी करु द्या..नाहीतर

औरंगाबाद : परीक्षेमध्ये कॉपी करताना पकडल्यावर पर्यवेक्षकांना गयावया करणारे अनेक विद्यार्थी आपण आजवर पहिले असतील. कॉपी करताना पकडल्यावर कधी गयावया केली जाते तर कधी पैशाचे आमिष दिले जाते. मात्र औरंगाबादमध्ये एका भावी शिक्षकाने कॉपी करताना पकडल्यावर थेट आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.

औरंगाबादमधील नवखंडा येथे असणाऱ्या डॉ. रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमन कॉलेजमध्ये हा सर्व प्रकार घडला. मराठवाडा विद्यापीठाच्या बीएड अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची परीक्षा सध्या सुरु आहे. यावेळी पर्यवेक्षकांनी एका विद्यार्थ्याला कॉपीकरून पेपर लिहित असताना पकडले. यावेळी ‘आपण नौकरीसाठी 35 लाख रुपये भरले असून ही परीक्षा पास होणं आवश्यक आहे. त्यामुळे कॉपी करु द्या, नाहीतर कॉलेजच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या करण्याची धमकी संबंधित विद्यार्थ्याने दिली.

पुढे हा पठ्या धमकी देवून थांबला नाहीतर सरळ परीक्षा हॉलमधून पळत सुटला. त्यामुळे घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याला समजावून परत वर्गामध्ये आणले.

You might also like
Comments
Loading...