औरंगाबाद शहरात अजूनही महिलांसाठी सार्वजनिक शौचालय नाहीत

औरंगाबाद : न्यायालयाने महिलांची कुचंबना टाळण्यासाठी शहरात शौचालय उभारा असे आदेश मनपा प्रशासनाला दिले असतांनाही एकही शौचालय उभारण्यात न आल्याने २८ फेब्रूवारी पर्यत काम पूर्ण झाले नाही तर १ मार्च रोजी महिलांचा मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी उपमहापौर स्मिता घोगरे यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.

महापौर घोडेले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात महिलांची मोठी संख्या असून त्यांच्यासाठी शौचालय नसल्याने त्यांची कुचंबना लक्षात घेवून उच्च न्यायालयाने स्वच्छतागृह उपलब्ध करुण देण्याचे आदेश दिले होते. त्या दृष्टिकोनातून जागतिक महिला दिना निमित्ताने औरंगपूरा, बॉटनीकल गार्डन, बीबी का मकबरा, पैठणगेट, भडकलगेट अशा पाच ठिकाणी जागा निच्छित केली मात्र यानंतर कुठलिही कार्यवाही करण्यात आली नाही, या बाबत वेळोवेळी मागणी करुनही प्रशासनाने टाळाटाळ केली.

महिलांच्या बाबतीत उदासिन धोरण अवलंबत असुन कारण नसतांना हे काम पुढे ढकलण्यात येत आहे त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचा देखिल अवमान होत असुन महिलांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न प्रशासन जाणुनबुजून करीत आहे.२८ फेब्रूवारी पुर्वी उपरोक्त सर्व ठिकाणी स्वच्छतागृह बांधण्याचे काम पुर्ण करण्यात यावे अन्यथा १ मार्च रोजी महिलांचा मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल असा ईशारा माजी उपमहापौर स्मिता घोगरे यांनी दिला आहे.