औरंगाबाद ग्रामीण पोलीस राज्यात “सर्वोकृष्ट पोलीस घटक”

औरंगाबाद : पोलीस महासंचलाक कार्यालय, मुंबई यांच्याकडून राज्यातील पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्हयांचा तपास, कायदा सुव्यवस्था राखणे या घटकांच्या आधारे पोलीस घटकांचे कामाचे मुल्यांकन निकषाद्वारे सकारात्मक, नकारात्मक  अशा जानेवारी-२० ते डिसेंबर-२० या कालावधीत दाखल गुन्हयांची तसेच वार्षिक गुन्हेगारीच्या आधारावर पेालीस महासंचालक कार्यालयाकडुन श्रेणी तयार करण्यात येऊन घटक कार्यालयाची “A” “B”, “C” अशा तिन श्रेणी मध्ये विभागणी करण्यात आली होती.

यामध्ये “A”श्रेणी मध्ये २४ घटक कार्यालये तर “B” श्रेणी मध्ये २४ घटक कार्यालयांची निवड करण्यात आली होती. या नमुद तीन वेगवेगळया श्रेणीतुन “सर्वोकृष्ट पोलीस घटक” विविध मापदंडाचे आधारे मुल्यांकन समितीद्वारे पडताळणी करण्यात आली.

पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये  औरंगाबाद ग्रामीण यांनी संपुर्ण निकषावर उत्तम कामगिरी करत संपुर्ण राज्यातुन सर्व श्रेणीमध्ये “ सर्वोकृष्ट पोलीस घटक” म्हणुन पोलीस महासंचालक कार्यालयाच्या मुल्यांकन समितीने पोलीस अधीक्षक कार्यालय, औरंगाबाद ग्रा. यांची निवड करून घोषीत केले आहे.

यात आठ निकषावर पोलीस अधीक्षक कार्यालय औरंगाबाद ग्रामीण यांची कामगिरी ही सर्वोकृष्ट असुन त्याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाकडुन सर्वोकृष्ट पोलीस घटक म्हणुन गौरविण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या