Aurangabad Violence- औरंगाबाद दंगलीमध्ये पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली –जयंत पाटील

मुंबई दि.१४ – औरंगाबाद दंगलीमध्ये पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आणि काही पक्षाचे नेते, पुढारी या दंगलीचे पुढे होवून नेतृत्व करत होते असे देखील मला सांगण्यात आले. त्यामुळे एकंदरीतच प्रकार बघितला तर सरकारने या दंगलखोरांना नियंत्रित करण्याचा कोणताही पोलिसांच्या माध्यमातून प्रयत्न केला नाही. दंगलीवर नियंत्रण आणण्याचे पोलिसांचे प्रयत्न फारच अपुरे होते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज केला. ते पक्ष कार्यालयात मिडियाशी बोलत होते.

औरंगाबाद दंगल साधारणपणे ११ वाजता सुरु झाली म्हणजे वाद सुरु झाला. २ वाजता दंगल उफाळून आली आणि बरोरबर ४ वाजता मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पहाटे ४ वाजता फोन केला. दंगल सुरु आहे परंतु पोलिस फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. दगडफेक सुरु आहे मात्र पोलिस लांब उभे आहेत. कुणाचेही नियंत्रण नाही आणि जाळपोळ सुरु आहे असं मला सांगितले. त्यावेळी तिथले सीपी मिलिंद भारंबे यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालं. ते म्हणाले मी तिथे पोचतोय. एकंदरीतच सकाळी ९ वाजता दंगल आटोक्यात आली.

पोलिसांची भूमिका फक्त बघ्याचीच होती. सीपी मिलिंद भारंबे यांनी वेळीच लक्ष घातले आणि त्यांनी प्रयत्न केल्यानंतर ही दंगल आटोक्यात आली. एकंदरीतच यामध्ये सरकारला दंगली व्हाव्यात अशा वाटतात की काय किंवा अशाप्रकारच्या दंगली झाल्या तरच आपल्याला राजकीयदृष्टया श्रेय मिळेल असा समजणारी मानसिकता आहे की काय अशी शंकाही जयंत पाटील यांनी उपस्थित केली.

You might also like
Comments
Loading...