aurangabad Violence : सहाय्यक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकरांची प्रकृती चिंताजनक

औरंगाबाद – औरंगाबादमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोन गटात झालेल्या वादामुळे तणाव निर्माण झाला. शहरातील काही भागांमध्ये जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. गांधीनगर, मोती कारंजा, रोजा बाग या भागात तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून जालन्याहून अतिरिक्त कुमक मागवल्याचे समजते. दगडफेकीत २५ जण जखमी झाले असून यात पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

दरम्यान, दंगलीवर नियंत्रण मिळवताना जखमी झालेल्या सहाय्यक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. कोळेकर यांच्यावर सिग्मा या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हिंचाचार रोखण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर शुक्रवारी मध्यरात्री दगडफेक करण्यात आली होती. यात कोळेकर गंभीर जखमी झाले आहेत. स्वरयंत्रणेच्या हाडाला जबर मार बसल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं वृत्त आहे.Loading…
Loading...