वेश्या व्यवसायातून तिथे कमवले जायचे रोजचे आठ लाख

औरंगाबादमधील प्रोझोन मध्ये व्यवसाय सुरू होता ही बाब उघड झाल्यानंतर पोलिसांनी तिथल्या दैनंदिन उत्पन्ना बाबत माहिती जाहीर केली

औरंगाबाद: सिडको परिसरातील प्रोझोन मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचे दिवसाकाठी तब्बल उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षाही जास्त असल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले आहे .गुरुवारी पोलिसांनी प्रोझोन मॉलमधील दोन स्पा सेंटरवर छापा टाकला होता यामध्ये थायलंडच्या बारा तरुणींसह स्पा सेंटरचे व्यवस्थापक आणि ग्राहकांना ताब्यात अटक केली होती.

प्रोझोन मॉलमध्ये फॅमिली स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती कारवाईसाठी.चार वेळा अयशस्वी सापळ्यांनंतर गुरुवारी सापळा यशस्वी झाला.हे दोन्ही स्पा सेंटर मुंबईच्या डेरिक मचदो आणि फैजल शेख यांच्या मालकीचे आहेत.दोघांनाही चौकशीसाठी बोलावणार असून या सेक्स रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण,याचा तपास सुरू असल्याचे उपायुक्त डॉ.दीपाली धाटे-घाडगे यांनी सांगितले.

छापा मारून पोलिसांनी स्पा मधील साहित्य जप्त केले.यात लाख रुपये रोख रक्कम सापडली.हे आठ लाख रुपये हे केवळ गुरुवारचे उत्पन्न होते.मध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी चलनही सापडले.,सर्व आरोपींना शुक्रवारी न्यायालयाने ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

टूरिस्ट पासपोर्ट वरच शहरात वास्तव्य होते त्या मुलींचे
पोलिसांनी अटक केलेल्या थायलंडच्या मुली बऱ्याच दिवसांपासून शहरात टुरिस्ट पासपोर्टवर वास्तव्यास आहेत.त्या एन-१ परिसरातील पाच बेडरूमच्या अालिशान फ्लॅटमध्ये राहत होत्या.टुरिस्ट पासपोर्टवर कर्मचारी म्हणून त्यांनी काम करणे अवैध असते.म्हणून त्यांना सी फॉर्म भरणेही आवश्यक असते.फ्लॅट मालकाने त्यांच्याकडे विदेशी नागरिक असल्याची माहिती पोलिसांना दिली नव्हती..

You might also like
Comments
Loading...