औरंगाबाद : औरंगाबाद की संभाजीनगर हा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आहे. संभाजीनगर वरून शहरात सतत राजकारण सुरू असते. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी राजकीय नेते संभाजीनगर मुद्द्याला तापवताना दिसतात. आता निवडणुका जवळ येत आहेत या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा संभाजीनगर मुद्द्याला तापायला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेना भाजप नेत्यांमध्ये संभाजीनगर करून चांगलीच जुंपली होती.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी झाली. भाजप सदस्य मधुकर वालतुरे (Madhukar walture) यांनी ‘संभाजीनगर’चा प्रस्ताव मांडला. गेल्या पाच वर्षांत हा ठराव मांडला गेला नाही, असे ते म्हणाले. त्यावरून शिवसेनेचे बांधकाम सभापती किशोर बलांडे(Kishor balande) म्हणाले की, नामकरणाचा प्रस्ताव निश्चितपणे आपण पाठवू. त्यासोबत औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ नामकरण करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. तो मंजूर करुन घेण्यासाठीही प्रयत्न करावेत, असा टोला वालतुरे यांना लगावला. यावरुन दोन्ही सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली.
बलांडे यांनी मध्यस्थी करीत जिल्हा परिषदेत पूर्वीच संभाजीनगरचा प्रस्ताव घेतला होता. तरी आज आपण तो पुन्हा घेवू, आणि विमानतळाच्या नामकरणासाठीही प्रयत्न करू असा तोडगा काढला. महापालिका क्षेत्रातील एकूण सदस्य वाढविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याच धर्तीवर ग्रामीण भागातील लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या औद्योगिक क्षेत्रामुळे इतर जिल्ह्यातील नागरिकांचे ग्रामीण भागात वास्तव वाढले आहे.
वाढती लोकसंख्या लक्षात घेवून जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीचे गण वाढवावेत, असा प्रस्ताव रमेश गायकवाड(Ramesh gaikwad) यांनी मांडला. त्यास सर्व सभागृहाने अनुमोदन दिले. बलांडे यांनी, प्रारूप आराखडा तयार होण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या वतीने गट आणि गणांच्या वाढीव संख्येसाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या सूचना केल्या. उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी बलांडे यांनीच संख्येच्या तुलनेत १० टक्के सदस्य पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘फ्लाइटमध्ये देखील चष्मा..’म्हणत ‘त्या’ व्हिडिओवर नेटकऱ्यांनी केली टिका
- सरकारचं ‘पॉवर सेंटर’ जिथे आहे तिथे मी आता उभा, पवारांच्या भेटीनंतर राऊतांचं वक्तव्य
- पती निकसोबत घटस्फोटच्या बातम्यासंदर्भात, प्रियांकांचा खुलासा
- ‘ही महाविकास आघाडी नसून ‘महाविनाश आघाडी’ आहे’
- चंद्रकांत पाटलांच्या सत्ताबदलाच्या वक्तव्यावरुन संजय राऊतांचा खोचक सल्ला; म्हणाले, आधी…
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<