औरंगाबादमध्ये कचऱ्यासोबत आता पाणी टंचाईही

औरंगाबाद – कचरा प्रश्न सुटता सुटत नसताना आता औरंगाबादमध्ये पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. शहराला पाणी पुरवण्याची जबाबदारी महानगरपालिकेची असते तर गांवस पाणी पुरवण्याची जबाबदारी ही जिल्हा परिषदची असते पण तरीही औरंगाबाद महापालिकेने बिडकीनला पाणी उपलब्ध करून दिले. पण पाणी पुरवठ्याच्या बिलभरणा ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने केला नाही त्यामुळे मनपाने त्यांना नोटिसा पाठवल्या. त्यांवर ग्रामस्थानी फारोळा येथील जलशुद्धीकरण यंत्राचा कर न भरल्याने सील ठोकू अशी नोटीस मनपाला पाठवली.

त्यानंतर मनपा व ग्रामपंचायत मध्ये मीटर बसवण्यात आले तरीही मनपाकडून पाणी कपात चालूच होती अखेर आज नागरिकांनी फारोळा जलशुद्धीकरणयंत्राचा ताबा घेतला व बिडकीनला जात असलेले पाणी बंद करु दिले नाही त्यामुळे आता उद्या औरंगाबाद मधील काही भागात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे .

You might also like
Comments
Loading...