कालच्या पावसात अमळनेरमधील दोघांचा मृत्यू

औरंगाबाद  : अमळनेर येथील दिलीप योगिनाथ मिसाळ (२५) हा घरात पावसाचे शिरलेले पाणी विद्युत मोटारपंपने बाहेर काढत होता. त्यावेळी विद्युत प्रवाह मोटारपंपात उतरुन त्यास शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी अडीचच्या दरम्यान घडली. पैठणमध्ये पावसाच्या पाण्याने साचलेल्या डबक्यात बुडून अडीच वर्षीय पार्थ परमेश्वर भुजबळ या बालकाचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. पार्थ अंगणात खेळतांना पाण्यात बुडाला पाण्यतच त्याचा मृत्यू झाला. काल सायंकाळ पर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची खबर होती.

You might also like
Comments
Loading...