औरंगाबाद: ‘या’ शिवसेना नगरसेवकाने ऍम्बुलन्समधून येऊन बजावला मतदानाचा हक्क

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीकडे विजयासाठी लागणाऱ्या संख्येपेक्षा जास्त संख्याबळ असले तरी खबरदारी म्हणून नियोजनबद्ध यंत्रणा राबवण्यात आली होती. इगतपुरीहून रविवारी (ता. 18) शहरात दाखल झालेले सदस्य सकाळी एकत्रितच मतदान केंद्रावर पोचले आणि मतदानाचा हक्‍क बजावला. डेंग्यूने आजारी असलेले नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांनी ऍम्बुलन्समध्ये येवून मतदानाचा हक्‍क बजावला.

निवडून येण्यापेक्षा जेवढी आवश्‍यकता आहे; त्यापेक्षा जास्त सदस्यांना इगतपुरी येथे सहलीवर नेण्यात आले होते. रविवारी रात्री उशिरा तीन टप्प्यात सदस्यांना शहरात आणण्यात आले होते. इथे आणल्यानंतर वीटस्‌, जिंजर आणि एमटीडीसीमध्ये महायुतीच्या सदस्यांना थांबवण्यात आले होते. तर ग्रामीण भागातील सदस्यांना संबंधित तालुक्‍यानुसार स्वतंत्र वाहणाने पाठवण्यात आले. औरंगाबाद तालुक्‍यातील सदस्य सकाळी साडेसातच्या सुमारास सर्व सदस्य एकत्रितपणे तर शहरी भागातील सदस्य थोडे उशिरा तहसील कार्यालयातील मतदान केंद्रात पोचले आणि मतदानाचा हक्‍क बजावला.

Loading...

आमदार संजय शिरसाट यांचे पूत्र व नगरसेवक सिद्धांत शिरसाटसाठी गेल्या तीन दिवसांपासून डेंग्यूमुळे एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. सोमवारी मतदानासाठी ते ऍम्बुलन्समधून तहसील कार्यालयात मतदान करण्यासाठी आले होते. प्रकृती ठीक नसतानादेखील महायुतीचे संख्याबळ कमी व्हायला नको म्हणून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्‍क बजावला.

पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अतुल सावे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे संपर्कनेते विनोद घोसाळकर, आमदार संजय शिरसाट, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, महापौर नंदकुमार घोडेले, भाजप नगरसेवक राजू शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीतील उमेदवार महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी मतदान केंद्राला भेट दिली.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
माझ्या भावाची प्रकृती ठणठणीत, काळजी करण्याचे कारण नाही - उदयनराजे भोसले