चिमुकलीस पळविण्याचा प्रयत्न फसला

औरंगाबाद: अडीच वर्षाच्या मुलीला तिच्या घराजवळून कानातील सोन्याच्या बाळ्यांसाठी पळवून नेण्याचा प्रयत्न फसला. या प्रकरणात निलेश तेजराव हुसे राहणार म्हाडा कॉलनी यांची अडीच वर्षाची मुलगी घराजवळ खेळत होती. तिच्या कानातील सोन्याच्या बाळ्या पाहून आरोपी सुनीता दीपक लोंढे हिने तिला केळीचे आमिष दाखवून उचलून घेवून जाण्यास सुरूवात केली. मात्र अचानक हुसे घराबाहेर आले आणि ते सुनीताला आडवे जात त्यांनी तिच्या तावडीतून मुलीला हिसकावून घेतले. त्यावर सुनीताने दीपक यांना बलात्कार व विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवीन अशी धमकी देण्यास सुरूवात केली. त्यांनी गल्‍लीतील अन्य महिलांना हाका मारल्या. या महिलांनी सुनीताला पकडून पोलिसांच्या हवाली केले. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.