मृत व्यक्‍तीचा सीमकार्ड वापरून महिलांना अश्‍लील फोन करणारा अटकेत

औरंगाबाद : मरण पावलेल्या व्यक्‍तीच्या नावाचे सीमकार्ड वापरून महिलांना अश्‍लील फोन करून त्रस्त करणा-या युवकास आज पोलिसांनी पकडले. या बाबत माहिती अशी की एका महिलेने तिला एक व्यक्‍ती फोन करून अश्‍लील संभाषण करत असल्याची तक्रार उस्मानपुरा पोलिस ठाण्यात केली होती.

bagdure

त्यानंतर त्या नंबरचा तपास केला असता तो नंबर एका मृत व्यक्‍तीच्या नावे असल्याचे निदर्शनास आले सदर व्यक्‍ती मरण पावल्यानंतर त्यांचे सीमकार्ड हरवल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले त्यानंतर पोलिसांनी त्या फोनच्या लोकेशनवरून तपास केला असता शिवाजी देविदास जाधव, राहणार मुकुंद वाडी हा सव्वीस वर्षाचा मुलगा या फोनवरून अनेक महिलांना बिनधघस्तपणे फोन करून अश्‍लील बोलत असल्याचे निदर्शनास आले.

सदर सीमकार्ड हे मृत व्यक्‍तीचेे असल्याचे त्याला माहित असल्याने त्याने गैरफायदा घेवून हा उदयोग केला होता. त्याने गुन्हयाची कबुली दिली आहे.

You might also like
Comments
Loading...