संतापजनक : औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य केंद्रात होतेय टोलवाटोलवी

औरंगाबाद : कोरोना आणि सारी सारख्या साथीच्या रोगांचा फैलाव शहरात वाढत आहे. या परिस्थितीत महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये नागरिकांना ज्या प्राथमिक सुविधा मिळणे अपेक्षित आहे, त्या मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

रस्ते पाणी आणि आरोग्य सुविधा पुरवणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आद्य कर्तव्य मानले गेले आहे. सध्याच्या कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रत्येकाला घाटी रुग्णालयात येऊन तपासणी करता येणे शक्य नाही. या परिस्थितीत महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये प्राथमिक आरोग्यसुविधा मिळणे अपेक्षित आहे. पण वस्तूतः तसे होत नाही.

आज सकाळी काही नागरिक हडको एन 11 मधील आरोग्य केंद्रांमध्ये तपासणीसाठी गेली. त्यांची ची कोणतीही तपासणी करण्याआधी तिथल्या उपस्थित कर्मचाऱ्यांनी आम्ही तपासणी करणार नाही हातावर शिक्का मारून देतो, तुम्ही आमच्या ॲम्बुलन्स नी घाटीत जा तिथे तुमचा इलाज होईल, असे सुनावले.

वास्तविक विकी प्रत्येक ताप हा कोरोनाच असेल असे नाही. त्यामुळे या सर्वसामान्य नागरिकांना तिथे या आरोग्य केंद्रात प्राथमिक आरोग्य सुविधा मिळणे अपेक्षित होते, पण तसे न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.