औरंगाबाद महापालिकाचे नवे आयुक्त निपुण विनायक

बाजार समिती

औरंगाबाद : दीपक मुगळीकर नंतर  केंद्र सरकारचे उप सचिव निपुण विनायक यांची महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.  नारेगाव परिसरातील ग्रामस्थांनी 16 फेब्रुवारीपासून कचराडेपोच्या विरोधात आंदोलन केले.  गेल्या 26 दिवसांपासून शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. मिटमिटा भागात नागरिकांवर अमानुष लाठीमार केल्याप्रकरणी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. त्यानंतर लगेचच आज शुक्रवारी सकाळीच  महापालिका आयुक्त दीपक मुगळीकर यांची तडकफडकी  वैधानिक विकास महामंडळाच्या संचालक पदावर   बदली करण्यात आली आहे. अवघ्या 11 महिण्यात त्यांची बदली झाली आहे.   पोलिस आयुक्ता नंतर मुगळीकर हे  कचर्‍याचा हा दुसरा बळी  ठरले आहेत.