पुढील आठवड्यात औरंगाबाद महापालिकेचा इंदौर दौरा

औरंगाबाद: कचरा प्रश्न चाळीस दिवसापासून कोंडी करून बसला होता. चिकलठाणा येथील दुग्धनगरीसाठीची ३५ एकर जागा मनपाने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निश्चित केली. त्यामुळे शहरातील कचरा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. शहरात नागरिक कचऱ्याने त्रस्त असताना काही दिवसापूर्वी शहराचे महापौर, आमदार व नगरसेवक हे फैमली सहल करून आले आणि प्रभारी मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कचऱ्यामध्ये स्वतःला वाहून घेतले.

आता पुन्हा हे पथक इंदौरचा दौरा करणार आहे पण हा दौरा कामानिम्मित्त असणार आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागा निश्चित झाली असता त्यावर प्रक्रियेसाठीची आवश्यक यंत्रसामुग्रीची पाहणी करण्यासाठी महापालिकेचे पथक पुढील आठवड्यात इंदूरचा दौरा करणार आहे. कचऱ्यासाठीचा डीपीआर स्वच्छ इंदूरच्या धर्तीवर केला असल्यामुळे इंदौर येथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्राची पाहणी करून यंत्र खरेदीचा निर्णय घेण्यासाठी हा दौरा होणार आहे. असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...