औरंगाबाद : महापालिकेने मोठा गाजावाजा करून औरंगाबाद फर्स्ट संघटनेच्या माध्यमातून कैलासनगर येथे गॅस शवदाहिनी सुरू केली आहे. मात्र आता या दाहिनीसाठी गॅस कोणता विभाग पुरविणार यावरून विभागांची टोलवाटोलवी सुरू आहे. स्मशानजोगींना लाकडाचे पैसे आरोग्य विभागामार्फत दिले जातात पण कैलासनगर येथील गॅस दाहिनीसाठी गॅस पुरवठा करण्याची जबाबदारी वॉर्ड कार्यालयावर टाकण्यात आली आहे. विद्युत विभागाचे पत्र पाहून वॉर्ड अधिकारी मात्र अचंबित झाले आहेत.
शहरात कोरोना संसर्गामुळे गतवर्षी मृत्यूदर वाढला होता. प्रत्येक स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी वेटींग असल्याचे विदारक चित्र होते. मृतदेहांवर तातडीने अंत्यसंस्कार व्हावेत यासाठी गॅस व विद्युत दाहिन्या सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. त्यानुसार महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी पुढाकार घेतला व गॅस दाहिनी उभारण्याची तयारी औरंगाबाद फर्स्ट या संघटनेने दाखविली. महापालिकेसोबत करार करत कैलासनगर स्मशानभूमीत दोन महिन्यात गॅस दाहिनी उभारली. गॅस दाहिनीवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. पण त्यासाठी लागणारा गॅस कोणत्या विभागामार्फत पुरविला जावा, यावरून कागदोपत्री खेळ सुरू आहे.
एका अंत्यसंस्कारासाठी तीन सिलिंडर लागतात. व्यावसायिक सिलिंडरची किंमत सुमारे दीड हजार रुपये आहे. महापालिकेतर्फे सध्या मोफत अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे सिलिंडर देखील महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे मोफत पुरविणे अपेक्षित आहे. पण विद्युत विभागाने प्रभाग नऊच्या वॉर्ड अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावर व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची व्यवस्था करावी, असे पत्र दिले आहे. मोफत अंत्यसंस्कारासाठी स्माशानजोगींना आरोग्य विभागामार्फत पैसे दिले जातात. पण सिलिंडरची जबाबादारी वॉर्ड कार्यालयावर का? असा प्रश्न वॉर्ड अधिकाऱ्यांना पडला आहे.
आरोग्य विभागाची अनास्था
गॅस शव दाहिनीचे लोकार्पण ऑगस्ट महिन्यात करण्यात आले आहे. आत्तापर्यंत या दाहिनीवर पाच ते सहा अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यासाठीच्या सिलिंडरचा खर्च अधिकाऱ्यांना खिशातून पैसे टाकून द्यावा लागला आहे. आरोग्य विभाग गॅस दाहिन्यांच्या खर्चाची जबाबदारी घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जिल्हा बँक निवडणुकीच्या विजयानंतर गायब असलेल्या नितेश राणेची पोस्ट
- सिंधुदुसिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपने निर्विवाद विजय मिळवला-चंद्रकांत पाटील
- सिंधदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
- कंगनाने केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यामुळे आणखी एक तक्रार दाखल
- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने चारली ‘मविआ’ला धूळ
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<