औरंगाबाद : राज्यात ‘बर्ड फ्लू’ या पक्षांतील आजाराने शिरकाव केल्याने शासन निर्देशानुसार महापालिकेने सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना वॉर्डनिहाय पक्षांचे पाणवठे, तलाव, नद्या, उद्याने, मोठे वृक्ष या ठिकाणांवर वॉच ठेवून पक्षांचा असाधारण मृत्यु झालेले पक्षी आढळल्यास त्वरीत माहिती देण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. हिमायत बाग परिसरात किंगफिशर पक्षी मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे .या पार्श्वभूमीवर आता बर्ड फ्लूच्या नियंत्रणासाठी सेंट्रल नाका येथील पशुचिकित्सालयात पालिकेने स्वतंत्र कंट्रोल रूम देखील स्थापन केली आहे. कार्यवाहीसाठी याठिकाणी चार अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
राज्यात सर्वत्र मृत पक्षी आढल्यास उचित कार्यवाही करून त्याचा अहवाल पाठवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यानुसार औरंगाबाद पालिकेला पुणे येथील पशुसंवर्धन व रोग अन्वेषण विभागाच्या सहआयुक्ताकडून खबरदारीच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. शासन निर्देशानुसार पालिका हद्दीतील पाणवठे, तलाव, सलीम अली सरोवर, खाम नदी, सुकना नदी, उद्याने, मोठे वृक्ष या ठिकाणांवर वन्यपक्षी किंवा स्थलांतरीत पक्षांचा असाधारण मृत्यु झाल्याचे आढळून आल्यास पालिकेचे पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त, तसेच जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालय यांच्याशी संपर्क करावा. यानंतर संबंधित यंत्रणाकडून बर्ड फ्लू या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी उचित कार्यवाही केली जाईल, अशा सूचना प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
मृत पक्षांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवणार
पालिकेच्या या कंट्रोल रूमला शहर हद्दीत एखाद्या पक्षाचा असाधारण मृत्यू झाल्याची माहिती कळाल्यास घटनास्थळी जाऊन मृत पक्षाचे नमुने संकलित केले जातील. नंतर संकलित नमुने तपासणीसाठी शहरातील खडकेश्वर येथील पशुचिकित्सालयात पाठवले जातील, अशी माहिती पालिकेचे मुख्य पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी.एस. नाईकवाडे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- हे पण आम्हीच केले…औरंगाबादमध्ये रंगली सेना- काँगेसमध्ये श्रेयवादाची लढाई
- कुठल्याही परिस्थितीत औरंगाबादचे संभाजीनगर होणारच; शिवसेनेच्या एकमेव मुस्लिम आमदाराचा एल्गार
- ‘गेंड्याच्या कातडीचे मंत्री व महाविकास आघाडीचे सरकार मुंडेंचा राजीनामा घेतील, असं वाटत नाही’
- ज्यांचा कोरोना लसीवर विश्वास नाही त्यांनी पाकिस्तानात निघून जावे; भाजप नेत्याचा अजब सल्ला
- जाणून घ्या ग्रामपंचायत निवडणुकीला एवढे महत्व का?