तिसऱ्या लाटेसाठी औरंगाबाद मनपा सज्ज, तब्बल सात हजार ऑक्सिजन बेड तयार!

औरंगाबाद : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सध्या खासगी व शासकीय हॉस्पिटल मिळून शहरात सात हजार ऑक्सिजन बेडची व्यवस्था झाली असल्याची माहिती मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

गरवारे येथे आयसीयू बेडची व्यवस्था केली आहे. एमजीएम आणि सिव्हिल हॉस्पिटल याठिकाणी ३०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णालयासाठी ऑक्सीजन प्लांट उभारणी सुरू आहे. मुंबईची सीएसआर कंपनी फंडातून देत असलेला प्लांटचे साहित्य शहरात आले आहे. या दोन्ही प्लांटमुळे शहरातील किमान ५०० बेड्सला ऑक्सिजन मिळू शकतो. मेल्ट्रॉन कोविड सेंटर याठिकाणी सध्या सिलेंडरद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जातो. या दोन प्लांटमध्ये कायम स्वरूपी ऑक्सिजन ची व्यवस्था होईल.

हवेतील ऑक्सिजन व इतर वायू वेगळे करणारी यंत्रणा या ठिकाणी बसविण्यात येणार आहे. दिवसाला सुमारे १७५ जम्बो गॅस सिलिंडरची निर्मिती करू शकेल. सध्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलसाठी १५० खाटांसाठी ऑक्सिजन सुविधा आहेत. हे काम एअरऑक्स या कंपनीला देण्यात आले आहे. यासाठी २ कोटी ७९ लाख रुपये खर्च केले जाणार आहे.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मुंबई येथील दीपक फर्टीलायझर या कंपनीने दिवसाला किमान चाळीस सिलिंडर उपलब्ध होतील असा प्लान दिला आहे.एका मिनिटाला किमान २५० लिटर ऑक्सिजन तयार होऊ शकतो. या प्लांटचे साहित्य शहरात आले असून लवकरच काम सुरू होईल अशी माहिती शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

IMP