तर औरंगाबाद ‘मनपा’ निवडणूका जातील लांबणीवर…!

तर औरंगाबाद ‘मनपा’ निवडणूका जातील लांबणीवर…!

amc aurangabad

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेत नगरसेवकांची संख्या लोकसंख्येनुसार १५१ पर्यंत वाढू शकते. मंत्रिमंडळाने नगरसेवक वाढविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे आणि औरंगाबाद महापालिकेला हा निर्णय लवकरच लागू होऊ शकतो. लवकरच सिडको वाळूज औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट होणार आहेत. दोन आठवड्यांत त्यावरही मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होईल. मात्र या हद्दवाढीविरोधात याचिका दाखल झाल्यास मनपा निवडणूक आणखी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरातील लोकसंख्येनुसार नगरसेवकांची संख्या देखील ठरवली जाते. औरंगाबाद महापालिकेचा क दर्जा आहे. २०१५ मध्ये ११५ वॉर्डांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. एप्रिल २०१९ मध्ये महापालिकेचा कार्यकाळ संपला. आता लवकरच औरंगाबादची निवडणूक होऊ शकते. यासंदर्भात आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबादमधील नगरसेवकांची संख्या १७ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनगणना झाली नसली तरीही मतदारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राज्य मंत्रीमंडळाने सर्वच महापालिकांमध्ये १७ टक्के नगरसेवक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार औरंगाबादच्या महापालिकेत आता ११५ ऐवजी १२६ नगरसेवक असतील. तसेच प्रभागांची संख्याही ३८ वरून ४२ पर्यंत जाईल. महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयावर राज्यपालांची सही महत्त्वाची आहे. सध्या काही महापालिकांमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू आहे. शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे जुन्या सदस्य संख्येनुसार प्रभाग रचना तयार होणार नाही. नवीन वाढीव सदस्यांचा अनुषंगाने प्रभाग रचना तयार होतील. मात्र वॉर्ड वाढणार असल्याने सीमाही बदलतील आणि बदलत्या सीमेबरोबरच शहरातील राजकारण हे वेगळेच वळण घेणार यात शंका नाही. त्यामुळे यावरून पुन्हा राजकीय मुद्दा पेटण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

महत्त्वाच्या बातम्या