VIDEO : औरंगाबाद महापालिकेत एम आय एमची झुंडशाही; तीन नगरसेवकांचे सभासदत्व कायमचे रद्द

औरंगाबाद: महापालिकेच्या सर्वसधारण सभेत पाण्याच्या प्रश्नावरून सभागृहात खुर्च्या भिरकावणाऱ्या एमआयएच्या तीन नगरसेवकांचे नगरसेवकांचे सभासदत्व कायमचे रद्द करण्यात आले आहे. औरंगाबाद महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांनी गोंधळ घालत खुर्च्या फेकल्या.दोन खुर्च्या या महापौरांना लागल्या. औरंगाबाद महानगरपालिकेचे महापौर भगवान घडमोडे यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यांची ही शेवटची सर्वसाधारण सभा होती.

शहरातील पाणी प्रश्नावर सर्वपक्षीय नगरसेवक जाब विचारत असताना. नियमित पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी करण्यात आली. जेवढी वसुली होते त्या पद्धतीनं पाणी पुरवठा व्हावा, असं शिवसेनेकडून सूचित करण्यात आलं. त्यावर एम आय एम कडून आक्षेप घेण्यात आला. यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली. एमआयएम नगरसेवक राजदंड पळवण्यासाठी पुढे आल्यान सुरक्षारक्षक पुढे सरसावले. त्यावेळी एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन आणि जफर बिल्डर यांनी त्यांना पाठीमागे धक्का देत खुर्च्या फेकल्या. झटापट सूरु असताना महापौर आसन सोडून सुरक्षा रक्षकाकडे गेले असता फेकलेली खुर्ची त्याच्या अंगावर पडली.

bagdure

जफर बिल्डर आणि सययद मतीन यांचं नगरसेवकपद कायमसाठी रद्द करण्यात आलं आहे. यापूर्वीही वंदेमातरम वरून पालिकेत जो राडा झाला होता. त्यामध्ये हे दोन्ही नगरसेवक आघाडीवर होते. त्यावेळी सभागृहाची तोडफोड केल्यामुळे एक दिवसासाठी त्यांच सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं. आजही अखेर महापौरांनी पोलिसांना सभागृहात बोलावे लागले.

पहा या अभूतपूर्व राड्याचा व्हिडीओ 

 

You might also like
Comments
Loading...