‘फ्युचर मॅनेजरां’नी फोडला अवघ्या सहा मिनिटांत एमबीएचा पेपर

औरंगाबाद: डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एमबीए शाखेचा अकौटिंग फॉर मॅनेजर हा पेपर अवघ्या ६ मिनिटांत फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे पेपरला सुरुवात होताच काही विद्यार्थ्यांनी त्याचे फोटो काढत व्हाटस्अॅपच्या ग्रुपवर पाठवले. वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला असून या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आल आहे.

bagdure

सकाळी दहा वाजता पेपर सुरू झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेचा फोटो ‘फ्युचर मॅनेजर’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवण्यात आले. तर दोन विद्यार्थी झाडाखाली बसून त्याची उत्तरे लिहित होते. दरम्यान हा सर्व प्रकार महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनात आला. प्रश्नपत्रिकेचा फोटो पाठवणाऱ्या विद्यार्थ्याचा डीपी पाहून तिघांनाही ताब्यात घेण्यात आल आहे.

You might also like
Comments
Loading...