औरंगाबाद मनपाने अनधिकृत टॉवर केले सील

औरंगाबाद: शहरात वाढत चालेले रस्त्यावरील अतिक्रमण व अनधिकृत टॉवरवर मनपा अतिक्रमण विभागाने आज कारवाई केली. शहरात दाखल होणाऱ्या विमानांना या टॉवरमुळे धोका असल्याचे विमान प्राधिकरणाने महानगरपालिकेला कळवले होते. त्यामुळे आज एन २ व एन ४ परिसरात असणारे चार ही टॉवर सील करण्याची कार्यवाही करण्यात आली.

एन ११ हडको यादवनगर मधील मुजाहिद असर फरूकी यांचे अनधिकृत बांधकाम बंद करून किरकोळ बांधकाम साहित्य जप्त करण्यात आले. सर्व्हे नं १८६ मयुर पार्कच्या पाठीमागे जाधववाडी भागत काही लोकांनी शिव रस्त्यांवर अतिक्रमण केल्यामुळे तो रस्ता बंद झाला. याबाबत स्थानिक नागरिकांनी महापौरांची भेट घेऊन रस्ता मोकळा करून देण्याचे निवेदन दिले होते. त्यामुळे संबंधित ५ नागरिकांनी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यावेळी सनियंत्रण अधिकारी एम.बी.काझी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाव पथक व मनपा पोलिस पथक यांनी कामगिरी पार पाडली.

You might also like
Comments
Loading...