कर्ज काढण्यासाठी मनपा वर चक्क इमारती गहाण ठेवण्याची वेळ

aurangabad mahanagar palika

औरंंगाबाद : शहरात सुरु असलेल्या ३६५.६९ कोटीच्या भूमिगत गटार योजनेच्या कामात वाढीव काम करण्यासाठी ९८.३१ कोटी अतिरिक्त रक्कम लागणार असल्याने यासाठी शासनाची परवानगी मिळाली आहे. हडको वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्यासाठी मनपाची मुख्य इमारत, टाऊन हॉल व बन्सीलाल नगर येथील अग्निशामक इमारत या तीन इमारती तारण ठेवण्यासाठी येत्या १८ ऑगस्ट रोजी आयोजित सर्वसाधारण बैठकीत मनपा प्रशासन प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.
अशी खळबळजनक माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळाली आहे.

यामुळे मनपा खरच कर्जासाठी इमारती गहाण ठेवणार का? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. येणाऱ्या १८ तारखेच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्तावावर मनपा आयुक्त व मनपा महापौरांचे काय उत्तर देणार हे उस्तुकतेचे ठरणार आहे.