औरंगाबाद लॉकडाऊन! दर १५ दिवसांनी ‘यांना’ कोरोना टेस्ट बंधनकारक

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील लॉकडाऊनच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण लॉकडाऊनबाबाच अधिकृत निर्णय जाहीर झाला आहे. येत्या ११ मार्च पासून ते ४ एप्रिल पर्यंत जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन असणार आहे. प्रत्येक शनिवार आणि रविवार संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज सांयकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

महत्त्वाचे म्हणजे खासगी कंपनीमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रत्येक १५ दिवसांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. त्या संबंधीचे प्रमाणपत्र सर्वांनी सोबत बाळगावे, असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.

औरंगाबादच्या लॉकडाऊनबाबत आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय , पोलीस आयुक्त  निखील गुप्ता आणि पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन बाबतचा निर्णय घेण्यात आला.

गेल्या १५ फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पूर्ण लॉकडाऊन करण्यापेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी अंशत: लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबादमध्ये येत्या ११ मार्चपासून अंशतः लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन ४ एप्रिलपर्यंत राहिल.

महत्वाच्या बातम्या