चर्चा फक्त औरंगाबादच्या ‘कचराबाणी’चीच

aurangabad kacharabani story

अभय निकाळजे (वरिष्ठ पत्रकार) औरंगाबाद : गेल्या वीस दिवसांपासून औरंगाबादेत सुरू असलेल्या ‘कचराबाणी’ची थेट भाजपच्या प्रदेश कार्यालयातून चौकशी केली. कारण पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जणाचा  मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली होती. महाराष्ट्रदेशा’च्या बुधवारी प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल भाजपच्या प्रदेश कार्यालयाने घेतली. त्यांनी आधी गोळीबार खरोखरच झाला किंवा नाही, याचीही खात्री करून घेतली. त्यानंतर बातमीत एकाच्या मृत्यूची भीती व्यक्त केल्याने विधीमंडळातही त्यावर चर्चा झाली. स्थानिक भाजप आमदारांना चौकशी करून माहिती घ्यावी असे प्रदेश कार्यालयाने आदेशित केले होते. त्यामुळेच भाजप नेत्यांना ‘महाराष्ट्र देशा’च्या बातमीदारांना संपर्क करावा लागला.

कूरघोडीच्या राजकारणाने कचऱ्याला मिळेना जागा
फक्त राज्य आणि केंद्रीय पातळीवर शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असणारे कुरघोडीच्या राजकारणाने औरंगाबादेत कचराबाणी निर्माण झाली. त्यामुळे हा प्रश्न जेवढा तापवत ठेवता येतील, तेवढा तो ठेवण्याची तयारी दोन्ही पक्षांनी केला आहे. त्यामुळे औरंगाबाद (मध्य) विधानसभेवर दावा ठोकण्यासाठी पुढाकार मात्र कुणीही तयार नाही. ज्या भागात कचरा टाकण्यासाठी गाड्या जात आहेत; त्या भागात मोठ्या प्रमाणात शिवसेना नेत्यांच्या जमीनी आहेत. जर नारेगावहून कचरा डेपो हलविला  नाही तर ज्या भागात नव्याने जो डेपो उभारला जाणार आहे. त्या भागातील जमीनींचे भाव उतरतील. त्यामुळे त्यांना आधी डेपो हलवायचे आहे.

काय आहे प्रकरण

नारेगाव येथून कचरा डेपो हलवावा ही मागणी अनेक वर्षापासून आहे. परंतू यावर कोणताही उपाय करण्यात आलेला नाही. खासदार आणि महापौर व इतर पदाधिकां-यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. समांतर पाणी पुरवठा योजना राज्य शासनाच्या जीवन प्राधिकरण व महापालिका प्रशासनाकडून करून घेण्याऐवजी खाजगी कंपण्याच्या घशात ही योजना घालण्याचे उद्योग खासदारांनी चालविले आहेत. आयुक्तापासून ते थेट सर्वौच्च न्यायलयाने व इतर सर्व जबाबदार यत्रणांनी ही योजना खाजगी कपंणीना देऊ नये असे सांगितलेले असतानाही खासदार ऐकत नाहीत.Loading…
Loading...