कचरा प्रश्न औरंगाबाद: स्वच्छतेसाठी पोलिस अधिकारी उतरले रस्त्यावर

औरंगाबाद: औरंगाबाद मधील कचरा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. शहरातील कचऱ्याला वैतागून नागरिकांनी आंदोलन देखील केले होते. आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे पोलिसांकडून लाठीचार्ग देखील करण्यात आला होता. तसेच पोलिसांनी नागरिकांवर दगडफेक केल्याचे वृत्त होते. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलीसांबाद्द्ल रोष आहे. आता मात्र शहरातील कचरा प्रश्न सोडवण्यासाठी पोलिस अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत.

 

पोलीस व मनपा प्रशासनाच्या वतीने आज सकाळीच शहरातील कचऱ्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावण्यासाठी सक्रीय उपाय राबवला गेला. शहराला कचरामुक्त करण्यासाठी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानामध्ये स्वतः प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नागरिक रस्त्यावर उतरले. या सर्वांनी रस्त्यावर उतरून संपूर्ण स्वच्छतेची जबाबदारी पार पाडली शहरातील सर्वच भागात आज सर्व अधिकारी, कर्मचारी उतरून स्वतःच्या हाताने कचरा साफ केला. त्यासोबत नागरिकांना आवाहन करून स्वच्छ औरंगाबादबद्दल माहिती दिली. या मोहिमेमुळे कचऱ्याच्या विळख्यात अडकलेल्या औरंगाबादकरांना दिलासा मिळू लागला आहे.

aurangabad police

You might also like
Comments
Loading...