fbpx

धक्कादायक : गावकऱ्यांच्या दगडफेकीला पोलिसांकडून देखील दगडफेकीनेच उत्तर

औरंगाबाद : औरंगाबादच्या कचरा प्रश्नाने आता हिंसक रूप धारण केल आहे. आतापर्यंत नागरिकांचा संताप पाहायला मिळत होता पण औरंगाबादजवळील पडेगावात काल कचरा प्रश्नावरून दगडफेक आणि जाळपोळ झाली. जवळपास दोन तासाच्या धुमश्चक्रीनंतर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी हुसकावून लावलं. मात्र त्यानंतर पोलिसांचा वेगळाच चेहरा पाहायला मिळाला.

पोलिसांनी गावात प्रवेश करून गावातील घरांवर दगडफेक केली, गल्लीबोळातील वाहनं फोडली, एवढंच काय ग्रामपंचायतीचा सीसीटीव्ही फोडण्याचाही प्रयत्न पोलिसांनी केला. काल रात्रभर दिसेल त्याला पोलिसांनी गुराढोराप्रमाणे 1200 लोकांवर कारवाई केली. या मारहाणीचा निषेध आमदार संजय सिरसाट यांनीही केलाय.

गावकऱ्यांच्या अन्नात कचरा कालवण्याच पाप महानगरपालिका करत आहे त्यामुळे नागरिकांचा संताप उफाळून येण साहजिक आहे त्यासाठी पोलिसांनी कायदा हातात घेऊन दहशत माजवण योग्य नाही, तेव्हा दोषी पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली आहे.

दरम्यान, पोलीस दगडफेक करताना आढळले त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल असं झोनल डीसीपी विनायक ढाकणे यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर नागरिकांकडून झालेल्या दगडफेकीत १० अधिकारी आणि २० कर्मचारी जखमी झाल्याची माहिती सुद्धा ढाकणे यांनी दिली आहे.

पहा पोलिसांचा हा वेगळाच चेहरा