गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता तरीही औरंगाबाद पूर्व विकासापासून वंचित

atul save bjp

टीम महाराष्ट्र देशा- औरंगाबाद पूर्वमध्ये भाजपाचे अतुल सावे, एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी आणि समाजवादी पार्टीचे कलीम कुरेशी यांच्यात लढत होणार आहे. २०१४ मध्ये भाजप, काँग्रेस, शिवसेना, एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी पंचरंगी लढत झाली होती. या लढतीत राज्यमंत्री अतुल सावे यांचा निसटता विजय झाला होता. तर डॉ. गफ्फार कादरी यांना पराभवाला समोरे जावे लागले होते.

औरंगाबाद पूर्व मतदारसंघात ‘एमआयएम’चे उमेदवार डॉ. गफ्फार कादरी यांना ‘वंचित’ने पाठिंबा दिला आहे. इतर मतदारसंघात मुस्लिम मतदारांनी ‘वंचित’ला साथ द्यावी अशी साद आंबेडकर यांनी घातली आहे. वंचितच्या पाठींब्यामुळे येथे कादरी यांची भाजपच्या अतुल सावे यांच्याशी तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी औरंगाबाद पूर्व हा मतदारसंघावर शिवसेनेला कधीच वर्चस्व प्रस्थापित करता आले नाही. २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या अतुल सावे यांनी एआयएमआयएमचे अब्दुल गफार कादरी यांचा ४ हजार २६० मतांनी पराभव करत निसटता विजय संपादन केला होता. २०१४ मधील एमआयएम पहिल्याच निवडणुकीत दुसऱ्या स्थानी राहिलं होतं. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपसमोर एमआयएमचे कडवे आव्हान असेल.

खैरे यांचा पराभव केल्याने एमआयएमचा आत्मविश्वास वाढला असून आता सावे यांचा पराभव करण्याचा चंग कादरी यांनी बांधला आहे. भाजपचे कार्यकर्ते हे जरी हवेत असले तरीही एमआयएमने देखील अत्यंत हुशारीने या मतदार संघात व्युव्हरचना केली आहे. खासदार जलील यांचे देखील या मतदारसंघावर बारीक लक्ष आहे. खरं तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे मात्र निवडून येण्याआधी सावे यांनी दिलेली बरीच आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत. बेरोजगारी,पाणी,कचरा आदी समस्या सोडविण्यात म्हणावे तितके यश आलेलं नाही.

जलील यांनी मिळविलेला विजय हा भाजप-सेनेविरोधात असलेल्या जनतेतील नाराजीचे प्रतिक मानला गेला. आता याच जनतेच्या नाराजीचा फटका भाजपचे उमेदवार अतुल सावे यांना बसू शकतो अशी शक्यता या मतदार संघात निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –