औरंगाबाद : सय्यद मतीनला मारहाण करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांना अटक

औरंगाबाद : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यावरुन औरंगाबाद पालिका सभागृहात झालेल्या मारहाणप्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांना अटक करण्यात आली आहे. मारहाण झालेला एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन यानं याबाबत तक्रार केली होती.

शुक्रवारी महानगरपालिकेची समांतर वाहिनीसंदर्भात विशेष सभा बोलाविण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात येत होती. याला एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी विरोध दर्शवला. यामुळे संतप्त होत सभागृहातील भाजप नगरसेवकांनी मतीन यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर नगरसेवक मतीन यांनी सभागृहातून पळ काढला होता. यानंतर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांच्या गाड्या फोडल्या होत्या.

मतीन यानं दिलेल्या तक्रारीवरुन भाजप गटनेते प्रमोद राठोड, उपमहापौर विजय औताडे, नगरसेवक राजगौरव वानखेडे, माधुरी अदवंत आणि रामेश्वर भादवेंविरोधात गुन्हा दाखल झालाय. या पाचही नगरसेवकांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. सभागृहात अमानुष मारहाण झाल्याचं त्यानं तक्रारीत नमूद केलं होतं.

‘जर वेळ पडली तर राम मंदिरासाठी संसदेतून कायदाही पारित करू’

 

You might also like
Comments
Loading...