औरंगाबादचे आयुक्त ‘समृद्धी’च्या भेटीला

samrudhhi

औरंगाबाद – कोरोना संसर्गामुळे महापालिकेचे सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालय नऊ महिन्यांपासून बंद असले तरी समृद्धी या वाघिणीने २५ डिसेंबर रोजी पहाटे पाच बछड्यांना जन्म दिला आहे. त्यामुळे प्राणिसंग्रहालयातील वाघांची संख्या १४ एवढी झाली आहे. त्यावेळी सुट्टीवर असलेल्या आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी मंगळवारी सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाची पाहणी केली. यावेळी प्रशासकांनी समृद्धी वाघिणीची भेट घेत अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना केल्या.

मराठवाड्यातील एकमेव असलेल्या महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात सर्वाधिक नऊ वाघ होते. त्यात आणखी पाच वाघांची भर पडली आहे. समृद्धी या वाघिणीने आत्तापर्यंत तब्बल १२ पिलांना जन्म दिला आहे. यापूर्वी १२ नोव्हेंबर २०१६ ला तिने एक नर दोन मादी अशा तीन बछड्यांना जन्म दिला होता. त्यानंतर २६ एप्रिल २०१९ ला समृद्धीने एक नर तीन मादी अशा चार बछड्यांना जन्म दिला होता. आता पुन्हा पाच बछड्यांना तिने जन्म दिला आहे.

आयुक्तांनी केल्या सूचना
बछड्याचे केअर टेकर यांनी जातीने या ठिकाणी हजर राहून सीसीटीव्ही कॅमेरेच्या मदतीने वाघीण व तिच्या पिल्लांवर नजर ठेवावी. थंडीचे दिवस असल्यामुळे पिंजऱ्यात उबदारपणा राहण्यासाठी रूम हिटरची व्यवस्था करण्यात यावी. या ठिकाणी भंडारासारखी दुर्घटना होऊ नये यासाठी केअर टेकर यांनी 3 शिफ्टमध्ये हजर राहून याची दक्षता घ्यावी, अशा सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केल्या.

महत्वाच्या बातम्या