औरंगाबाद शहरात जमावबंदी लागू

शहरात बाजारपेठ शैक्षणिक संस्था बंद

औरंगाबाद – भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ सिद्धार्थ नगर परिसरात दगडफेक झाली. गोदावरी शाळा, सिद्धार्थ नगर, टीव्ही सेंटर येथे मंगळवारी सकाळी जमावकडून दोन वाहने पेटवण्यात आली व रस्त्याने जाणाऱ्या लोकांना मारहाणदेखील करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला.

शहरात बाजारपेठ शैक्षणिक संस्था बंद

दगडफेकीत तीन पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर औरंगाबाद शहरात जमावबंदी लागू करण्यात आली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मंगळवारी होणाऱ्या सर्व परीक्षा, प्रात्याक्षिक रद्द केले आहे. पोलीस आयुक्तांनी कुलसचिवांशी चर्चा करून रद्द करण्याची विनंती केली होती. यावर परीक्षा विभागाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच प्रशासकीय कामकाज ही बंद करण्यात आल आहे. शहरातील अनेक महाविद्यालये, शाळा, बहुतेक बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.