कचरा प्रश्नावरून औरंगाबाद पेटले; पोलिसांकडून लाठीचार्ज

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये कचरा प्रश्नाने हिंसक वळण घेतले असून मिटमटा, पडेगावात कचरा टाकायला आलेल्या गाडयांवर स्थानिकांनी तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत दोन गाडयांची तोडफोड झाली असून पाच ते सहा पोलीस जखमी झाले आहेत. यावेळी पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्जही करण्यात आला.

kachara truck

औरंगाबादमध्ये कचरा टाकण्यावरून आंदोलन पेटले असून आंदोलक आक्रमक झाले आहेत. औरंगाबाद-मुंबई महामार्गावरील मिटमिटा या ठिकाणी नागरिकांनी आंदोलन छेडले. यावेळी आंदोलकांचा उद्रेक पाहून त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रूधूराच्या कांड्या फोडल्या. यावेळी जमावाकडून पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. संतप्त जमावाने पोलिसांच्या दोन गाड्यांवरही दगडफेक करत गाड्यांची तोडफोड केली. यात नऊ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

aurangabad police

You might also like
Comments
Loading...