राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द;शिवसेनेला न्यायालयाचा दणका

arjun-khotkar

औरंगाबाद: शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मस्तविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं आज हा निर्णय दिला.माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती. २०१४च्या विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, वेळ निघून गेल्यानंतर खोतकर यांनी स्थानिक उपविभागीय अधिकाऱ्यांकडं उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे ते निवडणूक लढविण्यास पात्रच नसल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं होतं. औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती नलावडे यांच्यासमोर आज या याचिकेवर सुनावणी झाली.

कोण आहेत अर्जुन खोतकर?

Loading...

अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे नेते असून, मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातून आमदार आहेत. जालना मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतात.1990, 1995, 2004 आणि 2014 असे एकूण चार वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. 1999 साली ते महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री होते.सध्या खोतकर हे महाराष्ट्र सरकारमध्ये वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास या मंत्रालयांचे राज्यमंत्री आहेत.आपल्या आक्रमक आणि मुद्देसूद भाषणासाठी अर्जुन खोतकर ओळखले जातात.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'