मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा : अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा- मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते  अजित पवार यांनी केली आहे. पक्षाच्या मेळाव्यानिमित्त ते आज औरंगाबादेत बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी तात्काळ विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक बोलवावी. मराठवाड्यात ८ महिन्यांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले. सध्या पाऊस नसल्यानं कापूस, सोयाबीनसारखी पिकं बळीराजाच्या हातून गेली आहेत, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली. सध्या जगात सर्वात महाग पेट्रोल भारतात मिळत असल्याचेही अजित पवार यांनी बोलून दाखवले तसेच भाजपला सत्तेबाहेर करण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही पवार म्हणाले.

दूध का दूध पानी का पानी व्हायलाच हवं, ते संभाषण समाजापुढे आणा – अजित पवार