औरंगाबादेत भाजपला खिंडार,’या’ बाहुबली नेत्यासह 7 नगरसेवक बांधणार शिवबंधन

औरंगाबाद  : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी महापौर गजानन बारवाल आणि माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह आठ ते दहा नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज हे सर्व जण ‘मातोश्री’वर जाऊन शिवबंधन बांधणार आहेत. दरम्यान किशचंद तनवाणी हे याआधी शिवसेनेतच होते. ते शिवसेनेचे आमदार आहेत.

मुळचे शिवसैनिक असलेले तनवाणी यांनी काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आपल्याला डावललं जातंय असं वाटल्याने त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्यासोबत 6 ते 7 समर्थक नगरसेवकही शिवसेनेत जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

Loading...

औरंगाबाद महापालिकेत गेली अनेक वर्ष शिवसेना आणि भाजपचं वर्चस्व राहिलं आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खौरे यांचा पराभव झाला आणि एमआयएमचे इम्तियाज जलील हे विजयी झाले.नंतर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबदमध्ये शिवसेनेची ताकद कमी झाली असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यातच विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेना वेगळी झाल्याने महापालिका निवडणुकीत कुठलाही फटका बसू नये याची काळजी शिवसेना घेत आहे.

तनवाणी भाजपच्या शहराध्यक्ष निवडीवरून ते काही दिवसांपासून नाराज होते. निवडणुकीआधीच आपली ताकद वाढविण्यासाठी शिवसेनेने नाराज तनवाणींना आपल्याकडे वळवलं आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्याने त्याचा फायदा शिवसेनाला झाला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात