५ ऑगस्ट आमच्यासाठी ऐतिहासिक नव्हे तर काळा दिवस!

iltiza mufti

श्रीनगर: गेल्या वर्षी ५ ऑगस्ट ला मोदी सरकारने भारताच्या घटनेत ऐतिहासिक निर्णय घेतला होता. याच दिवशी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवत लडाख ला देखील विकासासाठी अनेक मार्ग खुले करून दिले होते. तर, यावर्षी ५ ऑगस्टचाच मुहूर्त साधत आणखी एक ऐतिहासिक घटना घडणार आहे, ती म्हणजे रामभक्तांसह सर्व हिंदूंची अस्मिता असणाऱ्या अयोध्येत श्री राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे.

तर, आमच्यासाठी 5 ऑगस्ट हा काळा दिवस आहे, असे म्हणत जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती हिने केंद्र सरकारवर टीका केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. याठिकाणी बोलण्याचे स्वातंत्र्य कोणालाही नाही. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी इल्तिजा मुफ्तीने असे विधान केले आहे.

हे शिवशाहीचे नाही तर मोघलाईचे सरकार, मनसेचे महविकास आघाडीला थेट आव्हान!

तसेच, केंद्र सरकारने शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या नजरकैदेत तीन महिन्यांची वाढ केली आहे. एका वृत्तवाहिनीशी इल्तिजा मुफ्ती हिने चर्चा केली. यावेळी “आपल्यासाठी ५ ऑगस्ट हा ऐतिहासिक दिवस नाही. ५ ऑगस्ट हा आमच्यासाठी काळा दिवस आहे. गृहमंत्रालयाने माझ्या आईला का कैदेत ठेवले आहे?, या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकत नाही. कारण, माझ्या आईच्या मुद्द्याला नाझीर बनवायचे आहे.

दूध उत्पादक आक्रमक : महाआघाडी सरकारचा निषेध करीत विखे पाटलांनीही केले लोणीत आंदोलन

“जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याविरोधात सामूहिक संघर्ष आवश्यक आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आता स्वातंत्र्य नाही, येथे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सर्व लोक तुरूंगात आहेत. वसीम बारीच्या हत्येचा पुरावा आहे की, ३७० हटवल्यामुळे दहशतवाद संपणार नाही,” असे इल्तिजा मुफ्तीने म्हटले आहे.

तिघाडी सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्पेशल अपयशी ठरले आहे- रयत

दरम्यान, १३ मार्च रोजी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांची नजरकैदेतुन मुक्तता करण्यात आली होती तर जम्मू काश्मीरचे  इतर दोन्ही माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती अजूनही नजरकैदेत आहेत.