आरोग्य विभागाचे होणार ऑडिट

सोलापूर: महापालिका कुटुंब कल्याण शहर संकलन विभागात अनियमितता प्रथमदर्शनी गैरप्रकार आढळून आल्याने महापालिकेच्या वतीने या विभागाचे आॅडिट करण्यात येणार अाहे. त्याबाबतचे पत्र मनपा मुख्य लेखापरीक्षक कार्यालयास देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत म्याकलवार यांनी दिली.

सध्या आरोग्य अधिकारी डॉ. आडके रजेवर गेल्या आहेत.पथक आले होते. त्यांनी प्राथमिक स्वरूपात चौकशी केली आहे. त्यांनी अहवाल पाठवल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होईल, असे म्याकलवार यांनी सांगितले. याबाबत शनिवारी महापालिका सभागृहात नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी लक्षवेधी घेत चौकशीची मागणी केली. याप्रकरणी चौकशी करू, असे महापालिका आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले.तत्काळ गरज नाही, अशा रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत. मात्र नियमित लागणारी सोनोग्राफी मशीन खरेदी करण्यासाठी का दिरंगाई केली जातेय? आयुक्तांचा गैरसमज करून देण्याचा प्रकार अधिकारी वर्ग करीत आहेत, असे एका कर्मचाऱ्याने नाव छापण्याच्या अटीवर सांगितले.परवान्याचा मुद्दा तांत्रिकगाड्याची नोंदणी झाली आहे. फक्त नंबर मिळायचे आहेत. तो तांत्रिक मुद्दा असून लवकरच कार्यवाही होईल. सध्या मी रजेवर आहे. पदभार दुसऱ्याकडे आहे, असे अारोग्य अधिकारी डॉ.जयंती आडके यांनी सांगितले.