व्ही. के. सिंग यांना पाडू अन पार्टी करू… ऑडीओ व्हायरल

blank

टीम महाराष्ट्र देशा : निवडणुका आल्या की अनेक व्हिडीओ आणि ऑडीओ क्लिप व्हायरल होणे हे काही नवीन नाही. पण आता भाजपच्या गोटातूनच भाजपचे केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांचा पराभव करण्याबाबतची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये भाजपच्या एका पदाधिकाऱ्याकडून व्ही. के. सिंग यांना निवडणुकीत पाडण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची बाब समोर आली आहे.

स्वीकृत सदस्य बनविण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून ही क्लीप व्हायरल करण्यात आली आहे. तर या ऑडियो मध्ये भाजपचे ‘बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ’चे महानगर सह संयोजक कुलदीप शर्मा यांचा हा ऑडीओ आहे, तर कुलदीप शर्मा यांच्या कडून याबाबत कबुली देखील देण्यात आली आहे.

केंदीय मंत्री व्ही. के. सिंग यांना पडण्याचे कारस्थान चालू असल्याच या ऑडीओ क्लिप मधून समोर येत आहे.यामध्ये भाजपाचे उमेदवार सिंग यांना पाडल्यानंतर पार्टी करण्याचे बोलले गेले आहे.तर या षडयंत्राचे सूत्रधार हे प्रतिनिधी संजीव शर्मा आणि त्यांचे जवळचे पप्पू पहेलवान हे असल्याच कुलदीप शर्मा यांनी सांगितलं आहे.

तर आता या संदर्भात भाजप पदाधिकाऱ्यांनकडून एकमेकांवर आरोपांची फैरी झडू लागल्या आहेत. कुलदीप शर्मा यांनी सांगितल्या प्रमाणे या षड्यंत्रात संजीव शर्मा हे सूत्रधार आहेत तर संजीव शर्मा यांनी आता हे आरोप फेटाळले आहेत.